Joshua 13:21 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
म्हणजेच हेशबोन येथील. अमोऱ्यांचा राजा सीहोन याच्या अखत्यारीतील सर्व मुलुख व पठारावरील सर्व शहरे या हद्दीत होती. मोशेने सीहोन राजाचा व मिद्यानचे मांडलीक अवी, रेकेम, सूर, हूर व रेबा यांचा पराभव केला होता. (हे सर्व मांडलीक राजे सीहोनच्या बाजूने लढले होते.) ते तेथेच राहणारे होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पठारावरली सर्व नगरे, हेशबोनात राज्य करणारा अमोर्यांचा राजा सीहोन ह्याचे सर्व राज्य; ह्या राजाला व त्याच्याबरोबर त्या देशात राहणारे सीहोनाचे मांडलिक म्हणजे मिद्यानाचे सरदार अवी, रेकेम, सूर, हूर व रेबा ह्यांना मोशेने ठार मारले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पठारावरील सर्व शहरांचा आणि अमोर्यांचा राजा सीहोन, ज्याने हेशबोनात राज्य केले होते, याचे सर्व राज्य. मोशेने त्याचा आणि मिद्यानी सरदारांचा, एवी, रेकेम, सूर, हूर आणि रेबा, त्या देशात राहत असलेले व सीहोनाबरोबर मिळालेल्या राजपुत्रांचा पराभव केला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि पठारातली सर्व नगरे; म्हणजे अमोऱ्याचा राजा सीहोन त्याचे सर्व राज्य त्यामध्ये होते; त्याने हेशबोनात राज्य केले; त्यास मोशेने मारले, आणि देशात राहणारे सिहोनाचे मुख्य म्हणजे मिद्यानावरले अधिपती अवी रेकेम व सूर व हूर रेबा यांसहीत मारले.