Joshua 13:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मिसरमधील शीहोर नदीपासून उत्तरेस एक्रोनच्या सीमेपर्यंतचा भागही अजून काबीज केलेला नाही. त्या भूमीवर अजूनही कनानी लोकांचा ताबा आहे. गज्जा, अश्दोद, अष्कलोन, गथ व एक्रोन या पलिष्टचांच्या पाच नेत्यांचा तुला पराभव करायचा आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
(मिसर देशाच्या पूर्वेकडील शीहोर नदीपासून उत्तरेकडील एक्रोनाच्या सीमेपर्यंतचा प्रदेश कनान्यांचा समजला जातो; त्यात पलिष्ट्यांचे पाच सुभे होते, म्हणजे गज्जा, अश्दोद, अष्कलोन, गथ व एक्रोन);
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पूर्व इजिप्तच्या शिहोर नदीपासून उत्तरेकडे असलेल्या एक्रोनच्या सीमेपर्यंत सर्व मिळून कनानी लोकांचा प्रदेश समजला जात असे, जरी इथे गाझा, अश्दोद, अष्कलोन, गथ आणि एक्रोन असे पाच पलिष्टी शासक होते; अव्वी लोकांचा प्रदेश:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मिसराच्या पूर्वेस जी शीहोर नदी तिजपासून उत्तरेस जे एक्रोन त्याच्या सीमेपर्यंत ही जो देश, तो कनान्यांचा मानलेला आहे; गज्जी व अश्दोदी, अष्कलोन, गथी व एक्रोनी व अव्वी यांचे पलिष्टी पाच सुभेदार आहेत.