Joshua 13:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
रऊबेनी, गादी आणि मनश्शाच्या उरलेल्या अर्ध्या वंशातील लोक यांना त्यांचा जमिनीतील वाटा पूर्वीच मिळालेला आहे. परमेश्वराचा सेवक मोशे याने यार्देनच्या पूर्वेकडील भाग त्यांचा दिला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मनश्शेच्या बाकीच्या अर्ध्या वंशाबरोबर रऊबेनी व गादी ह्यांना आपल्या वतनाचा वाटा मिळालेला आहे. परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने त्यांच्याशी ठरवल्याप्रमाणे पूर्वेस यार्देनेपलीकडे त्यांना वतन दिले आहे,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मनश्शेहचे बाकीचे अर्धे गोत्र, रऊबेन आणि गाद यांच्या गोत्रांना यार्देनेच्या पूर्वेकडे आपले वतन मिळाले होते, याहवेहचा सेवक मोशेने त्यांच्याशी ठरविल्याप्रमाणे तो प्रदेश त्यांना वाटून दिला होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मनश्शेच्या बाकीच्या अर्ध्या वंशाला व रऊबेनी व गादी यांना आपल्या वतनाचा वाटा मिळाला आहे; परमेश्वराचा सेवक मोशे याने त्यांना यार्देनेच्या पलीकडे पूर्वेस जे दिले ते त्यांचे आहे.