Joshua 14:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अशाप्रकारे बारा वंशातील लोकांना आपापल्या हिद्दद्दयाची जमीन मिळाली. योसेफच्या वंशाची विभागणी मनश्शे व एफ्राईम अशा दोन वंशात झाली होती. त्यांनाही प्रत्येकी काही जमीन मिळाली. परंतु लेवीच्या वंशातील लोकांना जमिनीत हिस्सा मिळाला नाही. त्यांना राहण्याकरता काही गावे दिली गेली. प्रत्येक वंशाच्या वाठ्याच्या जमिनीत वस्तीसाठी गावे आणि गुराढोरांसाठी गायराने असा हिस्सा त्यांना मिळाला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
योसेफाच्या संतानाचे दोन वंश होते, ते म्हणजे मनश्शे व एफ्राईम; त्या देशात लेव्यांना त्यांनी काहीच वाटा दिला नाही, मात्र राहण्यास नगरे आणि गुरेढोरे व कळप ह्यांच्यासाठी गायराने दिली होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
योसेफाचे वंशज मनश्शेह व एफ्राईम अशा दोन गोत्रांमध्ये वेगळे झाले होते. लेव्यांना कोणताही वाटा मिळाला नाही, मात्र राहण्यास नगरे आणि त्यांच्या गुरांसाठी सभोवतालची कुरणे दिली होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
वास्तविक पाहता योसेफ वंशाचे दोन वंश मनश्शे व एफ्राइम असे होते, आणि लेव्यांना देशात त्यांनी वाटा दिला नाही, केवळ वस्तीसाठी नगरे, आणि त्यांच्या पशूंसाठी व त्यांच्या मालमत्तेसाठी त्यांना फक्त काही नगरात त्यांची जागा दिली.