Joshua 14:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
एकदा यहूदा वंशातील काही लोक गिलगाल येथे यहोशवाकडे आले. कनिज्जी यकुन्नेचा मुलगा कालेब हाही त्यांच्यात होता. तो यहोशवाला म्हणाला, “कादेश-बर्ण्या येथे परमेश्वर काय म्हणाला ते तुला आठवते ना? तो आपला सेवक मोशे याच्याशी बोलत होता. आपल्या दोघांविषयी ते बोलणे होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग यहूदा वंशाचे लोक गिलगालात यहोशवाकडे आले आणि कनिज्जी यफुन्नेचा मुलगा कालेब त्याला म्हणाला, “परमेश्वराने देवभक्त मोशे ह्याला तुझ्याविषयी व माझ्याविषयी कादेश-बर्ण्यात काय सांगितले होते ते तुला माहीत आहेच.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यहूदाह वंशाचे लोक गिलगाल येथे यहोशुआकडे आले. आणि कनिज्जी यफुन्नेहचा पुत्र कालेब त्याला म्हणाला, “कादेश-बरनेआमध्ये याहवेहने परमेश्वराचा सेवक मोशेला तुझ्या व माझ्याविषयी काय सांगितले हे तुला माहीत आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि यहूदा वंशाचे लोक गिलगालात यहोशवाजवळ आले तेव्हा कनिज्जी यफुन्नेचा पुत्र कालेब तो त्यास म्हणाला, “कादेश-बर्ण्यामध्ये परमेश्वराने देवाचा मनुष्य मोशे याला मजविषयी व तुजविषयी काय सांगितले होते ते तुला माहीतच आहे.