Joshua 15:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग बालापासून ही सीमा पश्चिमेला सेईर डोंगराकडे वळून यारीम डोंगर (म्हणजेच कसालोन) याच्या उत्तरेकडल्या भागाजवळून जाते आणि बेथ-शेमेशकडे उत्तरून तिम्नाकडे जाते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेथून ती सीमा बालापासून पश्चिमेस वळसा घेऊन सेईर डोंगरास पोचून यारीम उर्फ कसालोन डोंगराच्या उत्तर बाजूस जाऊन बेथ-शेमेश येथे उतरते व तशीच तिम्नाकडे निघते;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तिथून ती बालाहाच्या पश्चिमेस वळसा घेऊन सेईर पर्वताकडे गेली आणि यआरीम म्हणजेच कसालोन डोंगराच्या उत्तरेस जाऊन बेथ-शेमेश इथे उतरून तिम्नाहास जाऊन पोहोचते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग बालापासून ती सीमा पश्चिमेस सेईर डोंगराकडे फिरून यारीम डोंगर, म्हणजेच कसालोन त्याच्या उत्तरेकडल्या भागा जवळून गेली, आणि बेथ-शेमेशाकडे उतरून तिम्ना शहराकडे गेली.