Joshua 15:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अखसा अथनिएलकडे आली. तेव्हा अथनिएलने अखसाला आपल्या वडीलांजवळ आणखी जमीन मागायला सांगितले. अखसा वडीलांकडे निघाली. ती गाढवावरून उतरली तेव्हा कालेबने तिला विचारले “तुला काय हवे?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ती आली तेव्हा आपल्या बापापासून काही मागून घेण्यासाठी तिने त्याला चिथावले. ती गाढवावरून उतरली1 तेव्हा कालेबाने तिला विचारले, “तुला काय पाहिजे?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एक दिवस जेव्हा ती ओथनिएलकडे आली, तेव्हा तिने तिच्या वडिलांना एक शेत देण्याची त्याला विनंती केली. जेव्हा ती गाढवावरून उतरली, तेव्हा कालेबाने तिला विचारले, “मी तुझ्यासाठी काय करावे?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि ती त्याच्याकडे आली तेव्हा असे झाले की तिने आपल्या बापाजवळ शेत मागायला त्यास गळ घातली, आणि ती गाढवावरून उतरली, तेव्हा कालेबाने तिला म्हटले, तुला काय पाहिजे?