Joshua 17:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दक्षिणेकडील जमीन एफ्राईमची व उत्तरेकडूल मनश्शेची होती. भूमध्य समुद्र ही परिचमेकडील सीमा. ही सीमा उत्तरेकडील मनश्शेची होती भूमध्य समुद्र ही परिचमेकडील सीमा. ही सीमा उत्तरेला आशेरच्या जमीनीला आणि पूर्वेला इस्साखारच्या जमीनीला भिडलेली होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दक्षिणेकडील प्रदेश एफ्राइमाचा होता व उत्तरेकडला मनश्शेचा असून समुद्र त्याची सीमा होता. त्याच्या उत्तर सीमेस आशेर व पूर्वेस इस्साखार आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दक्षिणेकडील प्रदेश एफ्राईमच्या मालकीचा होता व उत्तरेकडे असलेली शहरे मनश्शेहची होती. मनश्शेहची सीमा भूमध्य समुद्रापर्यंत होती आणि त्याच्या उत्तरेकडे आशेर व पूर्वेकडे इस्साखार आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दक्षिणभाग एफ्राइमाचा, आणि उत्तरभाग मनश्शेचा, आणि समुद्र त्याची सीमा होता, आणि उत्तरेस आशेरात व पूर्वेस इस्साखारात ते एकत्र झाले.