Joshua 17:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आशेर आणि इस्साखारच्या प्रांतातही मनश्शेच्या वंशजांची काही नगरे होती. बेथ-शान, इब्लाम आणि त्या भोवतालची खेडी मनश्शेच्या वंशजांची होती. ते दोर, एन-दोर, तानख, मगिद्दो ही शहरे व त्यांच्या भोवतालची छोटी गावे यात राहात होते. ते नफाथच्या तोज शहरात देखील राहात होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इस्साखार व आशेर ह्यांच्या प्रांतांत मनश्शेचे गाव होते ते हे बेथ-शान व त्याची उपनगरे, इब्लाम व त्याची उपनगरे, दोर येथील लोकवस्ती व त्याची उपनगरे, एन-दोरची लोकवस्ती व त्याची उपनगरे, तानख येथील लोकवस्ती व त्याची उपनगरे, मगिद्दो येथील लोकवस्ती व त्याची उपनगरे हे तीन परगणे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इस्साखार आणि आशेरच्या प्रदेशात बेथ-शान, इब्लाम आणि दोर येथील लोक, एनदोर, तानख, आणि मगिद्दो त्यांच्या जवळच्या वसाहतीसह मनश्शेहचे होते (यादीतील तिसरे नगर नाफोथ होते).
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि इस्साखारात व आशेरात बेथ-शान व त्याची खेडी, आणि इब्लाम व त्याची खेडी, आणि दोर व त्याची खेडी यामध्ये राहणारे, आणि एन-दोर व त्यांची खेडी यामध्ये राहणारे, आणि तानख व त्यांची खेडी यांत राहणारे, आणि मगिद्दो व त्यांची खेडी यांत राहणारे, हे तीन परगणे मनश्शेचे झाले.