Joshua 17:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यहोशवा त्यावर म्हणाला, “तुमची संख्या वाढली असेल तर मग त्या डोंगराळ प्रदेशात जा. सध्या ती जमीन परिज्जी व रेफाई यांच्या मालकीची आहे. पण एफ्राईमाचा डोंगराळ प्रदेश तुम्हाला अपुरा पडत असेल तर त्या जमिनीचा ताबा घ्या.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यहोशवा त्यांना म्हणाला, “तुमची लोकसंख्या वाढली असली व एफ्राइमाचा डोंगराळ प्रदेश तुम्हांला पुरत नसला तर परिज्जी व रेफाई ह्यांच्या प्रदेशातील जंगलात जाऊन व झाडे तोडून तेथे राहा.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा यहोशुआने उत्तर दिले, “जर तुम्ही संख्येने पुष्कळ आहात आणि एफ्राईमचा डोंगराळ प्रदेश तुमच्यासाठी खूप लहान आहे, तर परिज्जी व रेफाईम लोक राहतात तो रानाचा प्रदेश तुमच्यासाठी मोकळा करून घ्या.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा यहोशवाने त्यांना म्हटले, “जर तुम्ही संख्येने बहुत आहात व लोक आणखी एफ्राइम डोंगराळ प्रदेश तुम्हाला पुरत नाहीतर परिज्जी व रेफाई यांच्या देशांतले रान तोडून तेथे वस्ती करा.”