Joshua 17:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तुम्ही तो डोंगराळ प्रदेश काबीज करा. ते जंगलच आहे पण झाडे तोडून तुम्ही राहायला चांगली सपाट जागा करून ध्या. तो प्रदेश तुमच्या मालकीचा होईल. कनानी लोकांना तुम्ही तेथून घालवून द्याल. ते लोक दणकट असले आणि सशस्त्र सज्ज असले तरी तुम्ही त्यांना पराभूत कराल.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा त्यांचा पहाडी देशही तुम्हांला मिळेल. तेथले जंगल तोडा म्हणजे आसपासचा प्रदेश तुमचा होईल. कनानी लोकांजवळ लोखंडी रथ असले व ते बलिष्ठ असले तरी तुम्ही त्यांना हाकून द्याल.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु अरण्यातील डोंगराळ भाग व त्याच्या टोकापर्यंतच्या हद्दी तुमच्या होतील; जरी कनानी लोकांजवळ लोखंडी रथ आहेत आणि ते फार शक्तिशाली आहेत, तरीही तुम्ही त्यांना घालवून देऊ शकाल.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा डोंगराळ प्रदेशही तुझा होईल; तो अरण्य आहे तरी तू ते तोडशील; बाहेरील भागही तुझे होतील, कारण कनान्यांना जरी लोखंडी रथ आहेत आणि ते बळकट आहेत तरी तू त्यांना घालवशील.”