Joshua 17:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मनश्शेच्या वंशातील इतर कुळांनाही जमिनीत वाटा मिळाला. अबीयेजेर, हेलेक, अस्त्रियेल, शेखेम, हेफेर व शमीदा हे ते योसेफ पुत्र मनश्शे याच्या वंशातील पुरुष होते. यांच्या कुटुंबांना जमिनीत हिस्से होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मनश्शेच्या बाकीच्या वंशजांना त्यांच्या-त्यांच्या कुळांप्रमाणे वाटे मिळाले. हे वाटे अबीयेजेर, हेलेक, अस्रियेल, शेखेम, हेफेर व शमीदा हे आपापल्या कुळांप्रमाणे योसेफपुत्र मनश्शे ह्याच्या वंशांतले पुरुष होते, त्यांच्या निरनिराळ्या कुळांसाठी हे वाटे ठरले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हा वाटा मनश्शेहच्या बाकीच्या लोकांसाठी; अबिएजेर, हेलेक अस्रिएल, शेखेम, हेफेर व शेमीदा यांच्या कुळांसाठी होता. योसेफाचा पुत्र मनश्शेहच्या कुळातील हे इतर पुरुष वंशज आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मनश्शेच्या राहिलेल्या वंशजांनाही त्यांच्या कुळांप्रमाणे विभाग मिळाले ते असे, अबीयेजेर व हेलेक व अस्रियेल व शेखेम व हेफेर व शमीदा हे आपआपल्या कुळांप्रमाणे योसेफ पुत्र जो मनश्शे त्याच्या वंशातले पुरुष होते, त्यांच्या निरनिराळ्या कुळांसाठी हे विभाग ठरले;