Joshua 17:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सलाफहाद हा हेफेरचा पुत्र; आणि हेफेर गिलादचा, गिलाद माखीरचा पुत्र आणि माखीर मनश्शे याचा. सलाफहादला मुलगा नव्हता त्याला पाचही मुलीच होत्या. महला, नोआ, हाग्ला, मिल्का व तिरसा ही त्यांची नावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण सलाफहाद बिन हेफेर बिन गिलाद बिन माखीर बिन मनश्शे ह्याला मुलगे नव्हते, मुलीच होत्या; त्या मुलींची नावे महला, नोआ, होग्ला, मिल्का व तिरसा ही होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मनश्शेहचा पुत्र माखीर, याचा पुत्र गिलआद, याचा पुत्र हेफेर, याचा पुत्र सलाफहाद याला पुत्र नव्हते, परंतु फक्त कन्याच होत्या, त्यांची नावे महलाह, नोआह, होगलाह, मिल्काह व तिरजाह ही होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मनश्शेचा पुत्र माखीर, याचा पुत्र गिलाद, याचा पुत्र हेफेर, याचा पुत्र सलाफहाद, याला मुलगा नव्हता, परंतु मुली होत्या; आणि त्याच्या मुलींची नावे ही आहेत: महला व नोआ, होग्ला, मिल्का व तिरसा.