Joshua 17:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
या मुली एलाजार हा याजक व नूनाचा पुत्र यहोशवा तसेच पंच यांच्याकडे येऊन त्यांना म्हणाल्या, “आम्हाला आमच्या पुरुष नातेवाइकांइतकाच वाटा द्यायला परमेश्वराने मोशेला सांगितले होते.” तेव्हा एलाजारने परमेश्वराची आज्ञा प्रमाण मानून त्यांनाही जमिनीत हिस्सा दिला. त्यांच्या वडीलांच्या भावांना मिळाला असता तसाच हिस्सा या मुलींना मिळाला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एलाजार याजक, नूनाचा मुलगा यहोशवा आणि सरदार मंडळी ह्यांच्यापुढे ह्या मुली येऊन म्हणाल्या, “आम्हांला आमच्या भाऊबंदांमध्ये वतन देण्याची परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती.” तेव्हा यहोशवाने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे त्यांना त्यांच्या बापाच्या भाऊबंदांबरोबर वतन दिले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या एलअज़ार याजक, नूनाचा पुत्र यहोशुआ आणि पुढाऱ्यांकडे गेल्या आणि म्हणाल्या, “याहवेहने मोशेला आज्ञा दिली होती की आमच्या कुटुंबामध्ये आम्हाला वतन दिले जावे.” तेव्हा यहोशुआने याहवेहच्या आज्ञेप्रमाणे त्यांच्या वडिलांच्या भावांबरोबर त्यांना वतन दिले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि एलाजार याजक व नूनाचा पुत्र यहोशवा व अधिकारी यांच्यापुढे त्या येऊन त्या म्हणाल्या, “परमेश्वराने मोशेला अशी आज्ञा दिली की आम्हांला आमच्या भाऊबंदांमध्ये वतन द्यावे.” यास्तव त्याने परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे त्यांना त्यांच्या वडिलाच्या भाऊबंदांमध्ये वतन दिले.