Joshua 17:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तप्पूहा भोवतालची जमीन मनश्शेची होती, पण खुद्द तप्पूहा गाव त्याच्या अखत्यारीत नव्हते. ते मनश्शेच्या जमिनीच्या सीमेवर असून एफ्राईमाच्या वंशजाचे होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तप्पूहाचा टापू मनश्शेचा होता; पण मनश्शेच्या सीमेवरील तप्पूहा हे एफ्राइमाचे होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
(मनश्शेहकडे तप्पूआहचा प्रांत होता, परंतु मनश्शेहच्या प्रदेशाच्या सीमेवरील तप्पूआह एफ्राईमकडे होते.)
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तप्पूहा प्रांत मनश्शेचा होता, परंतु मनश्शेच्या सीमेजवळचे तप्पूहा नगर एफ्राइमाच्या वंशाचे होते.