Joshua 17:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मनश्शेची हद्द तशीच पुढे दक्षिणेला काना नदीपर्यंत जात होती. हा भाग मनश्शेच्या वंशजांचा असला तरी नगरे एफ्राईमाच्या वंशजांच्या ताब्यात होती. नदीच्या उत्तरेला मनश्शेच्या जमिनीची हद्द असून ती पश्चिमेला भूमध्य समुद्रापर्यंत जात होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेथून ती सीमा काना ओहोळापर्यंत उतरून त्याच्या दक्षिणेस पोहचते; तेथील मनश्शेच्या प्रांतांतील काही नगरे एफ्राइमाची होती; आणखी मनश्शेची सीमा त्या ओहोळाच्या उत्तरेस जाऊन समुद्राला मिळते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ती सीमा पुढे दक्षिणेकडील कानाहा ओढ्याकडे जाते. एफ्राईमच्या मालकीची नगरे मनश्शेहच्या नगरांमध्ये होती, परंतु मनश्शेहच्या प्रदेशाची सीमा ओढ्याच्या उत्तरेकडे होती आणि भूमध्य समुद्राकडे संपते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि सीमा काना ओढ्यावरून, ओढ्याच्या दक्षिणेस गेली; ही नगरे एफ्राइमाची होती, ती मनश्शेच्या नगरांमध्ये होती; आणि मनश्शेची सीमा ओढ्याच्या उत्तरेस होती, आणि तिचा शेवट भूमध्य समुद्राजवळ होता.