Joshua 18:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सर्व इस्राएल लोक शिला येथे एकत्र जमले. तेथे त्यांनी सभामंडप उभारला. आता देश इस्राएल लोकांच्या हाती आला होता. त्यांनी त्या भागातील शत्रूना नामोहरण केले होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग इस्राएल लोकांची सर्व मंडळी शिलो येथे एकत्र झाली व तेथे त्यांनी दर्शनमंडप उभा केला; देश त्यांच्या हाती आला होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
संपूर्ण इस्राएली लोकांचा समुदाय शिलोह येथे एकत्र जमला आणि तिथे त्यांनी सभामंडप उभारला. देश त्यांच्या ताब्यात आला होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग इस्राएलाची सर्व मंडळी शिलो येथे एकत्र झाली, आणि तेथे त्यांनी दर्शनमंडप उभा केला, आणि त्यांच्यापुढे सर्व देश जिंकलेला होता.