Joshua 18:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यहूदा आणि योसेफ यांच्या मधला जमिनीचा हिस्सा बऱ्यामीनच्या वंशाला मिळाला. त्याच्या वंशातील प्रत्येक कुळाचा त्यात हिस्सा होता. त्यांना मिळालेली जमीन अशी.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बन्यामिनाच्या वंशजांना त्यांच्या कुळांप्रमाणे मिळालेला वाटा हा: त्यांचा वाटा यहूदाचे वंशज आणि योसेफाचे वंशज ह्यांच्या प्रांताच्या दरम्यान होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बिन्यामीन गोत्राच्या कुळानुसार पहिली चिठ्ठी निघाली. त्यांच्या वाट्याला आलेला भाग यहूदाह आणि योसेफाच्या गोत्रातील प्रांतांच्या दरम्यान होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा बन्यामिनाच्या वंशजांना नेमून दिलेला प्रदेश त्यांच्या कुळांप्रमाणे चिठ्ठी टाकून जो वाटा मिळाला तो असा; त्यांच्या वाट्याची सीमा यहूदाचे वंशज व योसेफाचे वंशज यांच्या मध्यभागी निघाली.