Joshua 18:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तिची उत्तरेकडील हद्द यार्देन नदीशी सुरु होऊन यरीहोच्या उत्तर बाजूने जाते. मग ती पश्चिमेला डोंगराळ प्रदेशात जाऊन बेथ-आवेनच्या पूर्वेला भिडते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांची सीमा उत्तरेस यार्देनेपासून सुरू होऊन यरीहोच्या उत्तर बाजूने वर जाऊन पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेशातून बेथ-आवेनच्या रानापर्यंत जाते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
उत्तरेकडील सीमा यार्देन नदीजवळ सुरू होऊन ती यरीहोच्या उत्तरेच्या उतरणीस जाऊन नंतर पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेशातून व बेथ-आवेनच्या रानातून गेलेली होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणजे उत्तर बाजूला त्यांची सीमा यार्देनेपासून सुरू होऊन यरीहोच्या उत्तरेकडून वर जाऊन, पश्चिमेकडे डोंगरावरून बेथ-आवेनापर्यंत रानात निघते.