Joshua 18:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
रेफाई खोऱ्याच्या उत्तरेकडील बेन हिन्नोमच्या खोऱ्यानजीकच्या डोंगर पायथ्याकडे ती उतरत जाते. तेथून यबूसी नगराच्या दक्षिणेला हिन्नोाम खोऱ्यात उतरुन एन-रोगेल कडे जाते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेथून हिन्नोमपुत्राच्या खोर्‍याच्या पूर्वेस व रेफाईम खोर्‍याच्या उत्तरेस असलेल्या पहाडांच्या उत्तर टोकापासून हिन्नोम खोर्‍यात म्हणजे यबूसी ह्यांच्या दक्षिणेकडे ती सीमा एन-रोगेल येथे उतरते;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तिथून ती खाली रेफाईम खोर्‍याच्या उत्तरेस असलेल्या हिन्नोम खोर्‍याच्या जवळील डोंगराच्या पायथ्याशी जाऊन पुढे हिन्नोम खोरे ओलांडून यबूसी लोक राहत त्या यरुशलेम शहराच्या दक्षिण बाजूने एन-रोगेल येथे गेली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग ती सीमा हिन्नोमाच्या पुत्राच्या खिंडीसमोरला डोंगर, जो रेफाईमाच्या तळवटीच्या उत्तरेला, त्याच्या काठी उतरली, आणि यबूसी यांच्या दक्षिण भागी हिन्नोम खिंडीत उतरून खाली एन-रोगेलास गेली.