Joshua 18:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा या कामासाठी निवडलेली मंडळी जमिनीच्या पाहणीसाठी बाहेर पडली. त्या प्रदेशाचे वर्णन लिहून काढले व तो यहोशवाकडे परत आणण्यासाठी ती निघाली. यहोशवा त्या लोकांना म्हणाला, “जमिनीचे नीट निरीक्षण करुन त्यांचे वर्णन तयार करा. मग ते घेऊन शिलो येथे मला येऊन भेटा. तेथे मी चिठ्ठ्या टाकीन. म्हणजे परमेश्वराच्या इच्छेनुसार जमिनीचे वाटप होईल.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग ते पुरुष मार्गस्थ झाले; तेव्हा त्या देशाचे वर्णन लिहिण्यासाठी जे जाणार होते त्यांना यहोशवाने आज्ञा दिली की, “जा, देशभर फिरा. आणि त्याचे वर्णन लिहून माझ्याकडे आणा म्हणजे मी शिलो येथे परमेश्वरासमोर तुमच्यासाठी चिठ्ठ्या टाकीन.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा ते पुरुष प्रदेशाची मोजणी करण्यासाठी निघाले, तेव्हा यहोशुआने त्यांना सूचना दिली, “जा आणि त्या प्रदेशाचे सर्वेक्षण करा आणि त्याचे वर्णन लिहा आणि परत माझ्याकडे या, मग मी येथे शिलोहमध्ये याहवेहसमोर तुमच्यासाठी चिठ्ठ्या टाकेन.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा ती माणसे तेथून निघून देशभर फिरली आणि यहोशवाने देशाचे वर्णन करणाऱ्यांना आज्ञा दिली; तो म्हणाला, “देशात चोहोकडे फिरून त्याचे वर्णन लिहा आणि माझ्याकडे परत या. मी येथे शिलोत परमेश्वरासमोर तुमच्यासाठी चिठ्ठ्या टाकीन.”