Joshua 19:47 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आपल्या वाटणीचा प्रदेश ताब्यात घ्यायला दानच्या वंशजांना त्रास झाला. त्यांच्या शत्रूचे सामर्थ्य अधिक होते. दानच्या लोकांना त्यांचा सहजासहजी पराभव करता आला नाही. तेव्हा दानच्या लोकांनी इस्राएलाच्या उत्तर भागाकडे जाऊन लेशेमशी त्यांनी लढाई केली. लढाईत लेशेमला हरवून त्यांचे लोक मारले. अशाप्रकारे दानचे लोक लेशेममध्ये राहू लागले. त्यांनी लेशेम हे नाव बदलून त्या शहराला आपल्या पूर्वजांचे दान हे नाव दिले,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दानाच्या वंशजांनी आपला प्रदेश वाढवला. त्यांनी लेशेमावर स्वारी करून ते लढून घेतले; तलवारीने त्यांचा विध्वंस केला आणि त्याचा ताबा घेऊन तेथे वस्ती केली; आणि लेशेमास आपला मूळ पुरुष दान ह्याचे नाव दिले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
(जेव्हा दानच्या गोत्राची सीमा त्यांनी गमावली, तेव्हा त्यांनी जाऊन लेशेम शहरावर हल्ला करून ते हस्तगत केले, तलवारीने त्यांचा नाश केला व तिथे वस्ती केली. लेशेममध्ये ते स्थायिक झाले व त्या शहराला त्यांचा पूर्वज दानचे नाव दिले.)
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दानाच्या वंशजाची सीमा त्यांच्या मूळ वतनाबाहेरही गेली, कारण की दान वंशजांनी लेशेम शहराशी लढून त्यास धरले; आणि तलवारीने त्यास मारल्यावर त्यांचा ताबा घेऊन त्यामध्ये वस्ती केली, आणि आपला पूर्वज दान याचे नाव त्यांनी लेशेम शहरास ठेवले.