Joshua 19:51 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अशाप्रकारे या जमिनीच्या वाटण्या इस्राएलच्या सर्व वंशांच्या लोकांमध्ये झाल्या. एलाजार हा याजक, नूनाचा पुत्र यहोशवा आणि वडील धारी मंडळी या कामासाठी शिलो येथे जमली होती. परमेश्वरासमोर सभामंडपाच्या प्रवेशद्धारात ते एकत्र जमले. अशाप्रकारे हे वाटपाचे काम समाप्त झाले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एलाजार याजक, नूनाचा मुलगा यहोशवा आणि इस्राएलाच्या वंशांच्या पितृकुळांचे प्रमुख ह्यांनी शिलो येथे दर्शनमंडपाच्या द्वारी परमेश्वरासमोर चिठ्ठ्या टाकून ही वतने वाटून दिली. ह्याप्रमाणे देश वाटून देण्याचे संपले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
या वतनसीमा एलअज़ार याजक, नूनाचा पुत्र यहोशुआ आणि इस्राएली गोत्राच्या कुळांच्या पुढार्यांनी शिलोह येथे सभामंडपाच्या प्रवेशद्वारात याहवेहच्या उपस्थितीत नेमून दिली. अशाप्रकारे त्यांनी देशाची वाटणी करण्याचे काम संपविले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एलाजार याजक व नूनाचा पुत्र यहोशवा व इस्राएलाच्या वंशांतले वडील अधिकारी यांनी शिलोमध्ये दर्शनमंडपाच्या दारी परमेश्वरासमोर, चिठ्ठ्या टाकून जी वतने वाटून दिली ती ही; याप्रमाणे त्यांनी देश वाटून देण्याचे संपले.