Joshua 19:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शिमोनचा प्रदेश यहादाच्या वाटच्या जमिनीच्या अंतर्गतच होता. यहूदाच्या लोकांची जमीन त्यांच्या गरजेच्या मानाने खूपच जास्त होती. म्हणून शिमोनच्या लोकांना त्यातच हिस्सा दिला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शिमोनाच्या वंशजांना यहूदाच्या वंशजांच्या वतनातूनच वाटा देण्यात आला. यहूदी वंशाचा वाटा त्यांच्यासाठी फार मोठा होता, म्हणून त्यांच्या वतनात शिमोनी वंशजांना वतन मिळाले. जबुलूनाला देण्यात आलेला प्रदेश
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शिमओन गोत्राच्या वतनाचा हिस्सा यहूदीयाच्या वतनातून घेतला होता, कारण यहूदाहचा भाग त्यांच्या गरजेपेक्षा मोठा होता. त्यामुळे शिमओन वंशाला त्यांचे वतन यहूदाह वंशाच्या सीमेमध्ये मिळाले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शिमोनाला यहूदी वंशजाच्या वतनातील प्रदेशातच वाटा देण्यात आला. कारण यहूदी वंशाचे वतन त्यांच्या संख्येच्या मानाने फार मोठे होते, म्हणून त्यांच्या वतनात शिमोनी वंशजाला वतन मिळाले.