Joshua 2:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा तुम्ही मला एक वचव द्या. मी तुमच्यावर दया दाखवली आणि तुमच्या मदतीला आले. तेव्हा माझ्या कुटुंबाच्या बाबतीत तुम्ही दया दाखवा. तशी परमेश्वराची शपथ घ्या मला तसे वचन द्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी तुमच्यावर दया केली आहे म्हणून आता माझ्यासमोर परमेश्वराच्या नावाने शपथ घ्या की, आम्हीही तुझ्या बापाच्या घराण्यावर दया करू; आणि ह्याबद्दल मला खात्रीलायक खूण द्या;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“तर आता मला याहवेहकडून वचन द्या की तुम्ही माझ्या कुटुंबावर दया दाखवाल, कारण मी तुमच्यावर दया दाखविली आहे. मला खात्रीने एक चिन्ह द्या,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी तुमच्यावर दया केली आहे, म्हणून आता माझ्यासमोर परमेश्वराच्या नावाने शपथ घ्या की, आम्हीही तुझ्या वडिलाच्या घराण्यावर दया करू, आणि मला अचूक खूण द्या,