Joshua 2:22 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ती माणसे बाहेर पडून टेकड्यांमध्ये गेली. तेथे त्यांनी तीन दिवस मुक्काम केला. त्यांचा तपास करणाऱ्यांनी सर्वत्र शोध केला. व तीन दिवसांनंतर तपास सोडून देऊन ते लोक नगरात परत आले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते जाऊन डोंगरवटीत पोहचले आणि त्यांचा पाठलाग करणारे परतून जाईपर्यंत तेथे तीन दिवस राहिले; त्यांचा पाठलाग करणार्‍यांनी वाटेत चहूकडे शोध केला, पण ते त्यांना सापडले नाहीत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा ते डोंगराळ भागाकडे निघून गेले आणि तीन दिवस तिथे राहिले, तोपर्यंत शोध करणार्‍यांनी सर्व रस्त्यांवर त्यांचा शोध घेतला आणि काही न सापडता ते परत आले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते जाऊन डोंगरास पोहचले, आणि त्यांच्या पाठलाग करणारे परत माघारी जाईपर्यंत तेथे तीन दिवस राहिले; त्यांचा पाठलाग करणाऱ्यांनी वाटेत चहूकडे शोध केला, पण ते त्यांना सापडले नाहीत.