Joshua 20:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“त्याने असे करावे. पळून जाऊन अशा नगराशी पोचल्यावर वेशीपाशी थांबावे. तेथे गावातील वडीलधाऱ्यांना झालेली हकीकत सांगावी. मग त्यांनी त्याला आत येऊ द्यावे. त्याला आपल्यात राहण्यासाठी जागा द्यावी
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
असा मनुष्य अशा एखाद्या नगरात पळून आला तर त्याने नगराच्या वेशीजवळ उभे राहावे आणि तेथील वडील मंडळीस आपली हकिकत सांगावी; मग त्यांनी त्याला आपल्या नगरात घेऊन आपल्यामध्ये राहायला जागा द्यावी.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा ते या शहरांपैकी एका शहराकडे पळून जातील, तेव्हा त्यांनी त्या शहराच्या वेशीवर उभे राहावे आणि आपली हकिकत त्या शहराच्या वडीलजनांना सांगावी. आणि त्या वडिलांनी त्या पळून आलेल्या व्यक्तीला त्यांच्या शहरात घ्यावे आणि त्यांच्यामध्ये राहण्यासाठी त्याला जागा द्यावी.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि त्याने त्यातल्या एका नगराकडे पळून गेल्यावर नगराच्या वेशीच्या दाराशी उभे राहून आपले प्रकरण त्या नगराच्या वडिलांना सांगावे; मग त्यांनी त्यास आपल्या नगरात घेऊन त्यास ठिकाण नेमून द्यावे, आणि त्याने त्यांच्यामध्ये रहावे.