Joshua 20:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण त्याचा पाठलाग करत येणारा माणूसही तेथे येऊन पोचेल तर तेव्हा या वडीलधाऱ्यांनी त्याला थोपवून धरावे. आश्रयासाठी आलेल्या व्यक्तीला त्यांच्या ताब्यात देऊ नये. त्यांनी त्याला संरक्षण द्यावे. कारण ज्याला मृत्यू आला त्याला या व्यक्तीने जाणून बुजून मारलेले नाही. ती चुकून योगायोगाने घडलेली गोष्ट होती. रागाच्या भरात. मारायचे ठरवून त्याने काही केले नाही. त्यावेळी ते चुकून झाले, इतकेच.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
रक्तपाताचा सूड उगवणार्याने त्याचा पाठलाग केला तर त्यांनी त्या मनुष्यवध करणार्याला त्याच्या हाती देऊ नये; कारण त्याने नकळत आपल्या शेजार्याचा वध केला आहे; त्याचे त्याच्याशी पूर्वीचे वैर नव्हते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर रक्ताचा सूड घेणारा शोध करीत आला तर, वडिलांनी त्या पळून आलेल्या व्यक्तीला त्याच्याकडे स्वाधीन करू नये, कारण त्याने आपल्या शेजार्याचा काही दुष्ट उद्देश नसताना वध केला आहे आणि त्याच्या मनात कोणतीही द्वेषभावना नव्हती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि जो रक्ताचा सूड घेण्याऱ्याने, त्याचा पाठलाग केला, तरी त्या नगराच्या लोकांनी मनुष्यवध करणाऱ्याला त्याच्या स्वाधीन करू नये; कारण की त्याने नकळत आपल्या शेजाऱ्याला मारले, त्याचे त्याच्याशी पूर्वीपासूनचे वैर नव्हते.