Joshua 20:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यार्देनच्या पूर्वेला रऊबेनींच्या प्रदेशापैकी वाळवंटातील यरीहो जवळचे बेसेर, गाद वंशाच्या विभागापैकी गिलादमधील रामोथ. मनश्शेच्या वंशातील बाशानमधील गोलान.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यरीहोच्या पूर्वेस यार्देनेपलीकडे त्यांनी रऊबेन वंशाच्या विभागापैकी पठारावरल्या रानातले बेसेर, गाद वंशाच्या विभागांपैकी गिलादातील रामोथ आणि मनश्शे वंशाच्या विभागापैकी बाशानातले गोलान ही नगरे नेमली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यार्देनेच्या पूर्वेकडे (यरीहोच्या पलीकडे) त्यांनी रऊबेन गोत्राच्या पठारावरील रानात असलेले बेसेर, गाद गोत्राच्या प्रदेशातील गिलआदातील रामोथ; आणि मनश्शेहच्या गोत्राच्या प्रदेशातील बाशानातील गोलान ही आश्रयस्थाने म्हणून वेगळी केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पूर्वेस यरीहोजवळ यार्देन नदीच्या पलीकडे रानातल्या सपाटीवर रऊबेनाच्या वंशांतले बेजेर, आणि गिलादात गाद वंशातले रामोथ, आणि बाशानात मनश्शेच्या वंशातले गोलान ही नगरे वेगळी करून ठेवली.