Joshua 20:9 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
इस्राएल लोक किंवा त्यांच्यात राहणारे परकीय यांच्यापैकी कोणाच्याही हातून चुकून मनुष्यवध झाल्यास त्याने पळून जाऊन आश्रय घ्यावा म्हणून ही नगरे नेमली. म्हणजे त्या व्यक्तीला संरक्षण मिळेल व तिचा पाठलाग करणाऱ्याच्या हातून ती व्यक्ती मारली जाणार नाही. मग त्या नगरातील न्यायसभेने निवाडा करावा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सर्व इस्राएल लोकांसाठी व त्यांच्यामध्ये वस्ती करणार्‍या उपर्‍या लोकांसाठी ही नगरे नेमलेली होती. कोणी एखाद्यास नकळत जिवे मारले व तो अशा एखाद्या नगरात पळून गेला, तर त्याला तेथील मंडळीसमोर उभे केल्याशिवाय रक्तपाताचा सूड घेणार्‍याकडून त्याची हत्या होऊ नये.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांच्यामध्ये राहणारा कोणा इस्राएली किंवा परदेशीयाने नकळतपणे कोणाची हत्या केली असेल, तर त्याने या नेमून दिलेल्या शहरांकडे पळून जावे, यासाठी की मंडळीसमोर खटल्यासाठी उभे राहण्याआधी रक्ताचा सूड घेणार्‍याकडून तो मारला जाऊ नये.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ही नगरे इस्राएलाच्या सर्व लोकांसाठी, आणि त्यामध्ये राहणारा जो परदेशी त्यांच्यासाठी अशी नेमलेली होती की जो कोणी चुकून मनुष्यास मारतो, त्याने त्यामध्ये पळून जावे, आणि तो सभेपुढे उभा राहीपर्यंत त्याने रक्ताचा सूड घेणाऱ्याच्या हातून मरू नये.