Joshua 21:27 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
लेवी वंशातील गेर्षोन कुळाला ही काही नगरे मिळाली. ती अशी: मनश्शाच्या अर्ध्या वंशातील लोकांनी त्यांना बाशान मधील गोलान दिले (गोलान हे आश्रयस्थान होते.) बैश्तरा देखील दिले. म्हणजेच एकंदर दोन नगरे व शिवार दिली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
लेव्यांच्या कुळांपैकी गेर्षोनाच्या वंशजांना मनश्शेच्या अर्ध्या वंशाच्या वतनातून मनुष्यवध करणार्यासाठी शरणपूर म्हणून नेमलेले बाशानातले गोलान व त्याचे गायरान, ह्यांखेरीज बैश्तरा व त्याचे गायरान अशी दोन नगरे दिली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
लेवी कुळातील गेर्षोनाच्या गोत्राला: मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राकडून: बाशानातील गोलान (हत्येचा आरोप असलेल्या व्यक्तीसाठी आश्रय शहर) व बीशतेराह त्यांच्या कुरणासह ही दोन नगरे देण्यात आली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लेवी वंशातील गेर्षोनाच्या कुळाला मनश्शेच्या दुस-या अर्ध्या वंशांतून हत्या करणाऱ्याच्या आश्रयाचे नगर बाशानातले गोलान व त्यांचे गायरान, आणि बैश्तरा व त्यांचे गायरान अशी दोन नगरे दिली;