Joshua 21:32 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
नफतालीच्या कुळातील लोकांनी गालील मधले केदेश दिले. (केदेश हे आश्रयाचे नगर) नफतालींनी हम्मोथ दोर आणि कर्तान ही ही दिली. म्हणजे एकंदर तीन नगरे व गुरांना चरण्यासाठी भोवतालची शिवारे दिली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नफताली वंशाच्या वतनातून मनुष्यवध करणार्‍यासाठी शरणपूर म्हणून नेमलेले गालीलातले केदेश व त्याचे गायरान, ह्याखेरीज हम्मोथ-दोर व त्याचे गायरान आणि कर्तान व त्याचे गायरान ही तीन नगरे दिली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नफतालीच्या गोत्राकडून: गालीलातील केदेश (हत्येचा आरोप असलेल्या व्यक्तीसाठी आश्रय शहर), हम्मोथ-दोर व करतान ही तीन नगरे त्यांच्या कुरणासह देण्यात आली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नफतालीच्या वंशातले हत्या करणाऱ्याच्या आश्रयाचे नगर गालीलातले केदेश व त्यांचे गायरान, आणि हम्मोथ-दोर व त्यांचे गायरान, आणि कार्तान व त्यांचे गायरान, अशी तीन नगरे दिली.