Joshua 21:43 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अशाप्रकारे इस्राएल लोकांना दिलेला शब्द परमेश्वराने खरा केला. कबूल केल्याप्रमाणे सर्व जमीन त्याने लोकांना दिली. लोकांनी ती ताब्यात घेतली व ते तेथे राहू लागले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इस्राएल लोकांना जो देश देण्याची परमेश्वराने शपथ वाहिली होती तो सबंध देश त्याने त्यांना दिला आणि तो काबीज करून ते त्यात राहू लागले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याप्रमाणे याहवेहने इस्राएलाच्या पूर्वजांना जो देश देण्याची शपथ घेतली होती, तो सर्व त्यांना दिला आणि त्यांनी त्याचा ताबा घेऊन त्यात वस्ती केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
याप्रमाणे परमेश्वराने इस्राएलाला जो देश त्यांच्या पूर्वजांना देण्याची शपथ वाहिली होती तो अवघा दिला; आणि ते तो वतन करून घेऊन त्यामध्ये राहिले.