Joshua 22:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्याखेरीज, शिलो येथे असलेल्या इस्राएलांच्या प्रत्येक कुळातून एक अशा दहा जणांनाही पाठवले. हे दहाजण आपापल्या कुळाचे प्रमुख होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि त्याच्याबरोबर इस्राएल लोकांच्या वंशांच्या पितृकुळातील प्रत्येक वंशामागे एक असे दहा सरदार पाठवले; ते इस्राएल लोकांच्या कुळांतील आपापल्या पितृकुळांचे प्रमुख होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याच्याबरोबर त्यांनी इस्राएलाच्या प्रत्येक गोत्रातून एक, जे इस्राएलच्या कुळांपैकी आपआपल्या पूर्वजांच्या दहा कुटुंबप्रमुख पुरुषांना पाठविले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि त्याच्याबरोबर इस्राएलाच्या प्रत्येक वंशातील पूर्वजांच्या घराण्याचा एकएक अधिकारी असे दहा अधिकारी पाठवले; आणि त्यांच्यातील प्रत्येकजण इस्राएलातील आपापल्या वंशाचा प्रमुख होता.