Joshua 22:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आणि तरी तुम्ही तेच करतात! हे परमेश्वराविरुद्ध बंड आहे. तुम्ही परमेश्वराला अनुसरण्याचे सोहून देणार आहात काय? तुम्ही हे थांबवले नाहीत तर सर्व इस्राएल लोकांवर परमेश्वराचा कोप होईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे काय थोडे झाले म्हणून तुम्ही आज परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून देत आहात? आज तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंड केले तर उद्या इस्राएलाच्या सर्व मंडळीवर त्याचा क्रोध भडकेल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि आता तुम्ही याहवेहपासून दूर जात आहात काय? “ ‘जर तुम्ही आज याहवेहविरुद्ध बंड केले तर उद्या संपूर्ण इस्राएली समाजाविरुद्ध याहवेहचा राग पेटेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सध्याच्या ह्या दिवसात परमेश्वरास अनुसरण्याचे तुम्ही सोडून देत आहात काय? आज तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंडाळी केली तर उद्या सर्व इस्राएल मंडळीवर त्याचा क्रोध होईल.