Joshua 22:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“परमेश्वराच्या उपासनेला तुमची भूमी तुम्हाला चांगली वाटत नसेल तर आमच्या भागात या. आमच्या भागात परमेश्वराचे निवासस्थान आहे आमच्या वाट्याची थोडी जमीन घेऊन हवे तर राहू शकता. पण परमेश्वराच्या शिकवणुकी विरुद्ध वागू नका. आता आणखी वेदी बांधू नका परमेश्वर देवाच्या निवासमंडपात आमच्या येथे एक वेदी आहेच.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुमच्या वतनाची भूमी अपवित्र असली तर परमेश्वराचा निवासमंडप जेथे आहे त्या परमेश्वराच्या वतनाच्या देशात नदीपार येऊन आमच्यामध्ये वतन घ्या, पण आपला देव परमेश्वर ह्याच्या वेदीखेरीज अन्य वेदी बांधून परमेश्वराविरुद्ध बंड करू नका आणि आमच्याविरुद्धही बंड करू नका.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर तुमच्या मालकीची जमीन अशुद्ध असेल, तर याहवेहच्या भूमीकडे या, ज्या ठिकाणी याहवेहचा निवासमंडप उभा आहे आणि ती भूमी आमच्याबरोबर वाटून घ्या. परंतु याहवेह आपल्या परमेश्वराच्या वेदीखेरीज आपल्यासाठी वेदी बांधून याहवेहविरुद्ध किंवा आमच्याविरुद्ध बंड करू नका.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि जर तुमच्या वतनाचा देश अशुद्ध असला, तर परमेश्वर वतनाच्या देशात, जेथे परमेश्वराचा निवासमंडप राहत आहे तेथे उतरून या, आणि आमच्यामध्ये वतन करून घ्या, परंतु आमचा देव परमेश्वर याच्या वेदी व्यतिरिक्त तुमच्यासाठी दुसरी वेदी बांधून आमचा देव परमेश्वर याच्याविरुद्ध आणि आमच्याविरुद्ध ही बंड करू नका.