Joshua 22:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“जेरहाचा मुलगा आखान आठवतो का? त्याने, नष्ट करुन टाकायच्या वस्तू विषयीची आज्ञा पाळायचे नाकारले. देवाची आज्ञा त्याने एकठचाने मोडली पण शिक्षा मात्र सर्व इस्राएल लोकांना झाली. आखान, त्याच्या पापामुळे मेला पण आणखीही बरीच माणसे मरण पावली.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जेरहाचा मुलगा आखान ह्याने समर्पित वस्तूंबाबत विश्वासघात केला तेव्हा इस्राएलाच्या सर्व मंडळीवर कोप झाला नव्हता काय? त्याच्या अपराधामुळे त्याचा एकट्याचाच नाश झाला असे नाही.”’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेरहाचा पुत्र आखान समर्पित वस्तूसंबंधी अविश्वासू राहिला, तेव्हा संपूर्ण इस्राएली लोकांवर क्रोध आला नाही काय? त्याच्या पातकामुळे मरण पावणारा तो केवळ एकटाच नव्हता.’ ”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेरहाचा पुत्र आखान याने समर्पित वस्तुंविषयी आज्ञेचा भंग केला, आणि इस्राएलाच्या सर्व मंडळीवर कोप झाला नाही काय? आणि तो पुरुष आपल्या अपराधामुळे एकटाच मेला नाही.