Joshua 22:24 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आम्ही ही वेदी होमार्पण धान्यार्पणा किंवा शांति-अर्पण करण्यासाठी बांधली असे तुम्हाला वाटते का? नाही, आम्ही ती त्यासाठी बांधली नाही. मग का बांधली बरे? उद्या कदाचित् तुमचे वंशज आम्हाला आपल्यापैकीच एक म्हणून ओळखणार नाहीत अशी आम्हाला भीती वाटली. तुम्ही कोण इस्राएल लोकांच्या परमेश्वर देवाची आराधना करणारे? असे कदाचित् ते विचारतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
खरोखरच आम्ही पुढचा विचार करून व विशिष्ट हेतूने हे कृत्य केले आहे; आम्हांला वाटले, मागेपुढे तुमची मुले आमच्या मुलांना म्हणायची की, इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्याशी तुमचा काय संबंध?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“नाही! आम्ही या भयाने हे केले की जर कधी तुमच्या वंशजांनी आमच्या वंशजांना विचारले, ‘याहवेह इस्राएलच्या परमेश्वराशी तुमचा काय संबंध आहे?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कदापि नाही, आम्ही अशा भीतीने विचार केला कि कदाचित पुढील काळी तुमचे पुत्र आमच्या पुत्रांना म्हणतील की इस्राएलाचा देव परमेश्वर याच्याशी तुमचा काय संबंध आहे?