Joshua 22:25 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देवाने आम्हाला यार्देनच्या पलीकडच्या तीरावरची जमीन दिली आहे. नदीमुळे आपण वेगळे पडलो आहोत. उद्या तुमची मुले मोठी होऊन तुमच्या प्रदेशावर सत्ता गाजवू लागली की, आम्हीही तुमच्यापैकीच आहोत हे ती विसरतील मग ते म्हणतील, “हे रऊबेन आणि गाद इस्राएलांपैकी नव्हेत’ आणि तुमचे वंशज आमच्या वंशजांना परमेश्वराची आराधना करायला प्रतिबंध करतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अहो रऊबेनी व गादी लोकहो, परमेश्वराने तुमच्या-आमच्यामध्ये यार्देनेची सीमा नेमून दिली आहे, तेव्हा तुम्हांला परमेश्वराशी काही कर्तव्य नाही असे म्हणून तुमची मुले आमच्या मुलांना परमेश्वराचे भय सोडून द्यायला लावतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आमच्या आणि तुमच्यामध्ये याहवेहने यार्देन नदीची सीमा ठेवली आहे. तुम्ही रऊबेनी आणि गाद लोकांनो! याहवेहमध्ये तुम्हाला वाटा नाही.’ तेव्हा तुमचे वंशज आमच्या वंशजांना याहवेहचे भय बाळगण्यास थांबवतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे रऊबेनी व गादी लोकहो, परमेश्वराने यार्देन ही सीमा लावून दिली आहे; तुम्हाला परमेश्वरावर हक्क नाही. अशा प्रकारे तुमचे वंशज आमच्या वंशजांना परमेश्वराचे भय धरण्यापासून परावृत्त करतील.