Joshua 22:27 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तुमचा आणि आमचा परमेश्वर एकच आहे हे दाखवणे हा वेदी बांधण्यामागचा उद्देश होता. तुम्हा आम्हाला व पुढच्या पिढ्यांना ही वेदी साक्ष राहील की हा आपला परमेश्वर आहे. आम्ही परमेश्वराला यज्ञार्पणे, अन्रार्पणे, शांतिअर्पणे करु. तुमच्याप्रमाणेच आम्हीही इस्राएल लोकांपैकी आहोत हे तुमच्या वंशजांना कळावे अशी आमची इच्छा आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर ती तुमच्या-आमच्यामध्ये व आमच्यामागून आमच्या व तुमच्या पिढ्यांमध्ये साक्ष व्हावी, ह्यासाठी की आम्ही होमबली, यज्ञबली व शांत्यर्पणे करून परमेश्वरासमोर उपासना करावी, म्हणजे परमेश्वराशी तुम्हांला काही कर्तव्य नाही असे पुढील काळी तुमच्या मुलांनी आमच्या मुलांना म्हणू नये.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तर ती आमच्या आणि तुमच्या आणि पुढच्या पिढ्यांमध्ये साक्ष असावी, यासाठी की आम्ही होमार्पण, यज्ञे व शांत्यर्पणे करून याहवेहच्या पवित्रस्थानी सेवा करावी, म्हणजे ‘याहवेहमध्ये तुम्हाला वाटा नाही’ असे भविष्यात तुमचे वंशज आमच्या वंशजांना म्हणू शकणार नाहीत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तर ती, आमच्या व तुमच्यामध्ये, आणि आमच्यामागे आमच्या पिढ्यांमध्ये हे साक्ष देण्यासाठी व्हावी; अशी की आम्ही परमेश्वरासमोर आपल्या होमार्पणांनी व आपल्या यज्ञार्पणांनी व आपल्या शांत्यर्पणांनी त्याची सेवा करीत जावी; आणि पुढल्या काळी तुमच्या संतानानी आमच्या संतानांना असे म्हणू नये की, “परमेश्वरावर तुमचा काही हक्क नाही.”