Joshua 22:33 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
इस्राएल लोकांचेही त्याने समाधान झाले. आनंद वाटून त्यांनी परमेश्वराचे आभार मानले. रऊबेनी, गादी आणि मनश्शे या लोकांविरुद्ध चढाई न करण्याचे त्यांनी ठरवले. ते लोक जेथे राहात होते तो प्रदेश नष्ट न करण्याचे त्यानी ठरवले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा इस्राएल लोकांचे समाधान होऊन त्यांनी परमेश्वराला धन्यवाद दिले आणि रऊबेनी व गादी ह्यांच्याशी लढण्याची अथवा ते राहतात तो देश उद्ध्वस्त करण्याची गोष्ट त्यांनी पुन्हा काढली नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा वृत्तांत ऐकून इस्राएली लोक आनंदित झाले व परमेश्वराची स्तुती केली आणि रऊबेनी व गाद लोकांशी लढण्याची किंवा ते राहतात त्या देशाचा नाश करण्याविषयी ते पुन्हा बोलले नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा इस्राएल लोकांचे समाधान होऊन त्यांनी देवाचा धन्यवाद केला, आणि ज्या देशात रऊबेन वंश व गाद वंश राहिले होते, तेव्हा रऊबेन व गाद यांच्याविरुद्ध लढाई करून त्यांचा नाश करावा असे ते कधीच म्हणाले नाही.