Joshua 22:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तो म्हणाला, “तुम्हाला सर्व ऐश्वर्य मिळाले आहे. भरपूर गुरेढोरे आहेत सोने, रुपे, मौल्यवान दागदागिने तुमच्याकडे आहेत. सुंदर, तलम वस्त्रे आहेत. शत्रूच्या लुटीतील अनेक वस्तू तुम्ही घेतल्या आहेत. त्यांची आपापसात वाटणी करुन आता आपापल्या ठिकाणी परत जा.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“विपुल पशू आणि रुपे, सोने, कांसे, लोखंड आणि भरपूर वस्त्रे अशी अमाप संपत्ती घेऊन आपापल्या डेर्‍यांकडे परत जा; आपल्या शत्रूंपासून मिळवलेली लूट आपल्या भाऊबंदांबरोबर वाटून घ्या.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“तुमची मोठी संपत्ती घेऊन घरी जा—गुरांचा मोठा कळप, चांदी, सोने, कास्य आणि लोखंड आणि पुष्कळ वस्त्रे आणि तुमच्या शत्रूपासून मिळालेली लूट आपल्या इस्राएली बांधवांसह वाटून घ्या.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा त्याने त्यांना असे सांगितले की, “बहुत द्रव्य व पुष्कळ पशुधन, रुपे आणि सोने, तांबे व लोखंड, आणि पुष्कळ वस्त्रे घेऊन तुम्ही आपल्या तंबूकडे माघारी जा आपल्या भावांबरोबर आपल्या शत्रूंची लूट वाटून घ्या.”