Joshua 23:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वराने इस्राएल लोकांना भोवतालच्या शत्रूंपासून विसावा दिला. त्यांना सुरक्षित केले. अशी अनेक वर्षे लोटली, आता यहोशवा बराच वृध्द झाला होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इस्राएलांना परमेश्वराने त्यांच्या आसपासच्या सर्व शत्रूंपासून स्वास्थ्य दिल्यावर बराच काळ लोटला; आणि यहोशवा वृद्ध व वयातीत झाला;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पुष्कळ काळ होऊन गेला होता आणि याहवेहने इस्राएली लोकास सभोवतालच्या सर्व शत्रूपासून विश्रांती दिली, तोपर्यंत यहोशुआ अतिशय वयस्कर झाला होता,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वराने इस्राएलला त्यांच्या आसपासच्या सर्व शत्रूंपासून विसावा दिल्यानंतर बराच काळ लोटला, आणि यहोशवा वृद्ध झाला होता.