Joshua 23:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“माझी अखेर आता जवळ येऊन ठेपली आहे. परमेश्वराने तुमच्यासाठी बऱ्याच महान गोष्टी केल्या हे तुम्ही जाणता व खरोखरच त्यावर विश्वास ठेवता. त्याने दिलेला शब्द पाळण्यात कुठेही कसूर केली नाही हे तुम्हाला माहीत आहेच. आपल्याला दिलेले प्रत्येक वचन त्याने पुरे केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी जगाच्या रहाटीप्रमाणे आता जात आहे. तुम्ही सर्व जण मनात विचार करा आणि लक्षात घ्या की, आपला देव परमेश्वर ह्याने तुमच्या बाबतीत हिताच्या ज्या गोष्टी सांगितल्या त्यांतली एकही निष्फळ झाली नाही; तुमच्याबाबतीत त्या सर्व सिद्धीस गेल्या; त्यांतली एकही व्यर्थ गेली नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“आता मी लवकरच सर्व जग जाते त्या वाटेने जाणार आहे. तुम्हाला तुमच्या सर्व हृदयाने व जिवाने माहीत आहे की, याहवेह तुमच्या परमेश्वरांनी तुम्हाला दिलेल्या सर्व चांगल्या अभिवचनातील एकही निष्फळ झाले नाही. प्रत्येक अभिवचन पूर्ण झाले आहे; एकही निष्फळ झाले नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तर पाहा, आज मी सर्व जग जाते त्या वाटेने जात आहे; परंतु तुम्ही आपल्या संपूर्ण मनात व आपल्या संपूर्ण चित्तात जाणता की ज्या चांगल्या गोष्टी तुमचा देव परमेश्वराने तुमच्याविषयी सांगितल्या, त्या सर्वांतली एकही गोष्ट कमी पडली नाही; अवघ्या तुम्हाला प्राप्त झाल्या; त्यातली एकही गोष्ट कमी पडली नाही.