Joshua 24:31 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यहोशवाच्या हयातीत आणि त्याच्या निधनानंतरही इस्राएल लोकांनी परमेश्वराची सेवा केली. परमेश्वराने इस्राएलासाठी काय केले हे पाहिलेली वडीलधारी माणसे जिवंत असताना लोक परमेश्वराची उपासना करत राहिले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यहोशवाच्या हयातीत आणि त्याच्या मरणानंतर जिवंत राहिलेल्या ज्या वडील लोकांना परमेश्वराने इस्राएलासाठी काय कार्ये केली हे माहीत होते त्यांच्या हयातीत इस्राएल लोकांनी परमेश्वराची सेवा केली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इस्राएली लोकांनी यहोशुआच्या सर्व आयुष्यात आणि त्याच्या मृत्यूनंतरही जे वडीलजन जिवंत राहिले आणि याहवेहने इस्राएलसाठी केलेल्या प्रत्येक गोष्टीचा ज्यांनी अनुभव घेतला, त्यांनी याहवेहची सेवा केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि यहोशवाच्या सर्व दिवसात, आणि जे वडील यहोशवाच्या मागे अधिक आयुष्य पावले, म्हणजे परमेश्वराने आपले जे काम इस्राएलासाठी केले होते, ते अवघे ज्यांनी पाहिले होते, त्यांच्या सर्व दिवसात इस्राएलांनी परमेश्वराची सेवा केली.