Joshua 4:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
सर्व इस्राएल लोकांच्या मनात त्या दिवशी परमेश्वराने यहोशवाबद्दल थोर असे महत्व बिंबवले. तेव्हापासून पुढे त्याचे आयुष्य असेपर्यंत त्यांनी मोशे प्रमाणेच यहोशवाविषयी आदर बाळगला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या दिवशी परमेश्वराने सर्व इस्राएलाच्या दृष्टीने यहोशवाची थोरवी वाढवली; म्हणून जसे ते मोशेचे भय धरत तसेच त्यांनी यहोशवाचे भय त्याच्या सगळ्या हयातीत बाळगले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या दिवशी याहवेहने यहोशुआला सर्व इस्राएली लोकांच्या दृष्टीत सन्मानित केले आणि जसे त्यांनी मोशेच्या संपूर्ण आयुष्यभर त्याचा आदर केला, तसाच त्यांनी यहोशुआचाही केला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्या दिवशी परमेश्वराने सर्व इस्राएलाच्या दृष्टीने यहोशवाची थोरवी वाढवली. जसे ते मोशेचे भय धरीत होते तसेच त्यांनी यहोशवाचे भय त्यांच्या सगळ्या हयातीत धरले.