Joshua 4:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यहोशवाचे ऐकून याजक करारकोश घेऊन नदीच्या पात्रातून बाहेर आले. याजकांचे पाय जमिनीला लागताच पाणी पुन्हा पूर्ववत वाहू लागले. नदी पुन्हा पहिल्यासारखी दुथडी भरून वाहू लागली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग परमेश्वराच्या कराराचा कोश वाहणारे याजक यार्देनेच्या मध्यभागातून निघून वर आले आणि त्यांचे पाय कोरड्या जमिनीला लागताच यार्देनेचे पाणी मूळ ठिकाणी परत आले आणि पूर्ववत दुथडी भरून वाहू लागले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि याजक याहवेहच्या कराराचा कोश घेऊन यार्देन नदीच्या पात्रातून वर आले. त्यांनी त्यांचे पाय कोरड्या जमिनीवर ठेवताच, नदीचे पाणी परत मूळ ठिकाणी आले आणि पूर्वीप्रमाणे ते भरून वाहू लागले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग परमेश्वराचा कराराचा कोश वाहणारे याजक यार्देनेच्या मध्य भागातून निघून वर आले आणि त्यांचे पाय कोरड्या जमिनीला लागताच यार्देनेचे पाणी मूळ ठिकाणी परत आले आणि चार दिवसांपूर्वी जसे होते त्याप्रमाणे पुन्हा दुथडी भरून वाहू लागले.