Joshua 5:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दुसऱ्या दिवसापासून स्वर्गातील खास अन्न म्हणजेच मान्ना येणे बंद झाले. कनानातील भूमीत पिकलेले अन्न लोकांनी खाल्ल्यानंतर हे झाले त्यावेळेपासून इस्राएलांना स्वर्गातील खास अन्न मिळाले नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांनी देशातले उत्पन्न खाल्ले त्याच्या दुसर्या दिवसापासून मान्ना बंद झाला, तो पुन्हा इस्राएल लोकांना मिळाला नाही; त्या वर्षी त्यांनी कनान देशातले उत्पन्न खाल्ले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी त्या जमिनीतून उगविलेले धान्य खाल्ले त्याच्या दुसर्या दिवसापासून मान्ना मिळण्याचे थांबले; तिथून पुढे इस्राएली लोकांना कोणताही मान्ना मिळाला नाही, परंतु त्या वर्षी त्यांनी कनानमधील उपज खाल्ला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांनी देशांतले उत्पन्न खाल्ले त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मान्ना बंद झाला; तो पुन्हा इस्राएल लोकांस मिळाला नाही, त्या वर्षी त्यांनी कनान देशातले उत्पन्न खाल्ले.