Joshua 5:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यरीहोजवळ असताना यहोशवाने समोर पाहिले तर एक माणूस पुढे उभा असलेला त्याला दिसला. त्या माणसाच्या हातात तलवार होती. यहोशवाने पुढे होऊन त्याला विचारले, “तू आमच्या बाजूचा आहेस की शत्रूच्या गोटातील?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यहोशवाने यरीहोजवळ असताना समोर पाहिले तो कोणी पुरुष आपल्या हाती उपसलेली तलवार घेऊन पुढे उभा आहे असे त्याच्या नजरेस पडले. यहोशवाने जवळ जाऊन विचारले, “तू आमच्या पक्षाचा की आमच्या वैर्‍यांच्या पक्षाचा?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता यहोशुआ जेव्हा यरीहोजवळ होता, त्याने वर पाहिले आणि त्याला दिसले की त्याच्यासमोर एक पुरुष तलवार हातात घेऊन त्याच्यासमोर उभा आहे. यहोशुआ त्याच्याजवळ गेला आणि त्याला विचारले, “तू आमच्या बाजूने आहेस की आमच्या शत्रूच्या बाजूने आहेस?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यहोशवाने यरीहोजवळ असताना समोर पहिले तो कोणी पुरुष आपल्या हाती उपसलेली तलवार घेऊन पुढे उभा आहे असे त्याच्या नजरेस पडले. यहोशवाने जवळ जाऊन विचारले, तू आमच्या पक्षाचा की आमच्या वैऱ्यांच्या पक्षाचा?