Joshua 5:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यावर तो उत्तरला, “मी तुमचा शत्रू नव्हे. परमेश्वराच्या सैन्याचा सेनापती या नात्याने नुकताच येथे तुझ्यासमोर आलो आहे.” यावर यहोशवाने त्याला जमिनीवर डोके टेकवून आदरपूर्वक अभिवादन केले आणि विचारले, “स्वामीची काय आज्ञा आहे? मी आपला सेवक आहे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो म्हणाला, “नाही; मी येथे परमेश्वराचा सेनापती ह्या नात्याने आलो आहे.” तेव्हा यहोशवाने त्याला दंडवत घालून म्हटले, “स्वामींची आपल्या दासाला काय आज्ञा आहे?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“कोणाच्याही बाजूचा नाही,” त्याने उत्तर दिले, “परंतु याहवेहचा सेनानायक म्हणून मी आलो आहे.” तेव्हा यहोशुआने आदराने त्याच्यासमोर लोटांगण घातले आणि त्याला विचारले, “माझ्या प्रभूकडून त्याच्या सेवकासाठी काय आदेश आहे?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो म्हणाला, “दोहोंपैकी कोणतेही नाही; कारण मी परमेश्वराच्या सेनेचा सेनापती आहे.” तेव्हा यहोशवाने त्यास नमन करण्यासाठी आपले मुख भूमीकडे करून म्हटले, “माझ्या स्वामीची आपल्या सेवकाला काय आज्ञा आहे?”